Posts

Showing posts from September, 2012
मानवी हक्क  माणूस जोपर्यंत गुलामीत धन्यता मानतो तोपर्यंत त्याचे लाड होतात. ज्यावेळी तो गुलामीचा त्याग करतो त्यावेळी त्याचेवर अत्याचार होतात. बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो स्वत:च बंड  करून उठेल. आणि हे बंड  भारतीय राज्यघटना व युनोनी दिलेल्या मानवी हक्कांच्या आधारे करणे शक्य असल्याने मानसिक गुलामीतून मुक्तता आणि मानवी हक्कांचा आग्रह याकडेही पुरेशा गांभीर्याने पाहायला हवे. धर्म म्हणतो 'ढोर शुद्र गंवार और नारी यह सब ताडन के अधिकारी' गुलामीला नकार दिल्यावर अत्याचार ठरलेले आहेत म्हणून मानवी हक्कांच्या हननाविषयी आपण पुरेसे गंभीर असायला हवे. वरील वैचारिक भूमिकेतून मानव मुक्ती अभियानाची रणनीती व कार्यक्रम आखले गेले आहेत. ते पुढील प्रमाणे.                       १.  मूल्य परिवर्तन                 -   बुद्ध धम्म व विवेक वाद                       २. व्यवस्था परिवर्तन             -  मार्क्स वाद                       ३. भेद निर्मुलन                      - ( जाती अंत, वर्ग अंत, स्त्री दास्य मुक्तता, धार्मिक / प्रादेशिक /                            
स्वप्रयत्न माणूस मागे राहिला, याला दोन करणे असतात. एक म्हणजे व्यवस्थेनी त्याला मागे ठेवला, आणि दुसरे म्हणजे त्याच्या दुर्गुनामुळे तो मागे राहिला. कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता हे.  मला जर साताऱ्यातून पुण्याला जायचे असेल तर मला सातारा सोडावा लागेल. सातारा न सोडता मी पुण्याला जावू शकणार नाही. तसेच मागासालेपानाशी जोडलेल्या बाबींचा त्याग केल्या शिवाय प्रगतीचा हात धरता येणार नाही. बाबासाहेबांचा लढा हा बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारलेला आहे. बुद्धाने जगाचे अस्तित्व मान्य केले. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, पूर्वजन्म, पुनर्जन्म या संकल्पना नाकारल्या. त्याने सांगितले. १. जगात दु:ख आहे. २. दु:खाला काही तरी कारण आहे. ३. जर दु:खाचे  कारण आपण दूर केले ४. तर दु:ख दूर होईल त्या काळाला अनुसरून त्याने दु:खाची १२ कारणे सांगितली. व ती दूर करण्याचा सल्ला दिला. बाबासाहेबांनी हेच तत्वज्ञान  दलितांच्या दु:खाला लागू केले. त्यांच्या दु:खाची कारणे शोधून ती दूर करणे हा त्यांच्या लढ्याचा मार्ग राहिलेला आहे. माझी जात, माझा धर्म, माझा परंपरागत व्यवसाय, माझे अज्ञान / निरक्षरता, माझे अस्वछ / घाणेरडे राहणीमान, म