Posts

Showing posts from October, 2012
Image
वन खाते रचना  जनता -----> प्रधानमंत्री -----> केंद्रीय वनमंत्री -----> मुख्यमंत्री -----> वनमंत्री ----->  सचिव वनखाते -----> Principal Chief Conservator of Forest -----> मुख्य वनसरंक्षक -----> उपवनसरंक्षक -----> विभागीय वनसरंक्षक -----> उपविभागीय वनसरंक्षक ----->  वनपरिक्षेत्र अधिकारी -----> वनपाल (फोरेस्टर ) -----> बिट गार्ड -----> वाचमन 
Image
महसूल खाते रचना  जनता -----> मुख्यमंत्री -----> महसूल मंत्री -----> मुख्यसचिव महसूल खाते ----->  प्रधान सचिव महसूल खाते -----> सचिव महसूल खाते -----> आयुक्त -----> जिल्हाधिकारी -----> अतिरिक्त जिल्हाधिकारी / निवास उपजिल्हाधिकारी ----->  उपविभागीय दंडाधिकारी / प्रांत अधिकारी / उपविभागीय अधिकारी / असिस्टंट  कलेक्टर -----> तहसीलदार / कार्यकारी दंडाधिकारी  -----> न्याय तहसीलदार / निवासी नायब तहसीलदार -----> मंडळ निरीक्षक -----> तलाठी -----> कोतवाल 
पंचायती राज रचना  जिल्हाधिकारी -----> मुख्यकार्यकारी अधिकारी (जी. प.) -----> गटविकास अधिकारी ----->  ग्रामसेवक (ग्रामपंचायत)
न्यायालयाची रचना  सुप्रीम कोर्ट -----> हाय कोर्ट -----> डिस्ट्रीकट कोर्ट -----> तालुका कोर्ट  _________________________________________________________________________________ सुप्रीम कोर्ट -----> हाय कोर्ट -----> आयुक्त -----> अडीशणाल कलेक्टर -----> तहसीलदार 
पोलीस खात्याची रचना  जनता -----> प्रधानमंत्री -----> केंद्रीय गृहमंत्री -----> मुख्यमंत्री -----> गृहमंत्री -----> सचिव गृहखाते  -----> पोलीस महासंचालक म. सा. मुंबई -----> विशेष पोलीस महानिरीक्षक -----> पोलीस अधीक्षक (SP)  -----> उपविभागीय  पोलीस अधिकारी (DYSP) -----> मंडळ पोलीस अधिकारी -----> पोलीस उपनिरीक्षक  -----> सहायक पोलीस निरीक्षक -----> ठाणे हवालदार (फिर्याद घेतो) -----> नाईक हवालदार -----> पोलीस  पाटील 

ग्रामसभा

Image
ग्रामसभा  जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात. माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे. ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल. अनेक गावात प्र
Image
कार्यकर्ता कसा असावा  (हा लेख कृपया मूल्यांच्या बाजूने न वाचता व्यावहारिक बाजूने वाचावा. काळ वेळेनुरूप व ठिकाणानुरूप व्यवहार वेगळा असने आवश्यक आहे. उद्दिष्टांशी गाठ झाल्याशी मतलब ...) कोणत्याही सरकारी कार्यालयात जाताना ७ ते ८ जणांच्या ग्रुपने जावे. एकट्या दुकट्याने शक्यतो जावू नये. ग्रुपने गेल्यावर इम्प्रेशन पडते. व अधिकाऱ्यावर दबाव येतो. एकट्या दुकटयाला शक्यतो कुणी दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे मिळतात. अधिकारयाने आपल्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपला पेहेरावही तसाच असावा. प्लेन शर्ट सौम्य रंगाचा, गडद रंगाची प्लेन पेंट, असा प्रोफेशनल ड्रेस असावा. व्यवस्थित धुवून इस्त्री करून कपडे घालावेत. शक्यतो इनशर्ट केला असल्यास बेल्ट बेंबीच्या खाली १ इंच असावा जास्त वर किंवा जास्त खाली पेंट ओढू नये. कपड्यांची शिलाई कडक व आरामदायक असावी. जीन्स पेंट, ती शर्ट, रंगीबेरंगी भडक कपडे घालून कार्यालयात जावू नये. ढगळे, गबाळे कपडे वापरू नयेत. शक्यतो काळा बूट वापरावा. बुटास पोलिश असावे. स्पोर्ट शूज म्हणजे पांढरे, रंगीबेरंगी बूट ऑफिसमध्ये जाताना वापरू नयेत. बूट नसल्यास चप्पल वापरण्यास हर
असली नकली चेहरे. आज सामान्य जनतेला फसवनेचा काळ आलेला आहे. सामान्य माणसाला फसवून, त्याला लुबाडून प्रचंड प्रमाणामध्ये लुट केली जात आहे. सरकारी अधिकारयाचा असा समज झाला आहे कि, त्यांना पगार हा कार्यालयात हजार राहण्यासाठी मिळतो. लोकांची कामे करण्यासाठी नव्हे. लोकांची कामे करण्याच्या बदल्यात त्यांना चिरीमिरी लोकांकडून मोबदला म्हणून मिळते. पैसे मिळाल्यावर अधिकाराचा गैरवापर करून खरयाचे खोटे व खोट्याचे खरे केले जाते. लाच न देणाऱ्याला दुपारी या, चार वाजता या, उद्या या, गुरुवारी या अशी उत्तरे मिळतात. अमुक कागद अपुरा, पलीकडच्या ऑफिसात जा, भलतीकडेच जा अशी उडवाउडवी ची उत्तरे मिळतात. काही माहिती विचारायला गेल्यास जणू गुन्हाच केला असल्यासारखे वागवतात. तलाठी ७/१२, ८ अ चा उतारा, भूमिहीन दाखला, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला इ. साठी लाच खातो, तर ग्रामसेवक आणि सरपंच अनुदान लाटतात. पोलिसांना तर तक्रारदार हवाच असतो. ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे. त्याच्या कडून भरपूर पैसे उकळून अन्याय ग्रास्ताची केस दाबने हा पोलिसांचा सरकारमान्य धंदा आहे. गुंड मवाली सामान्य जनतेकडून खंडणी वसूल करतात - बेकायदेशीरपणे तर
आंदोलनाच्या पायऱ्या  + आंदोलन करताना नेमका प्रश्न काय आहे? त्याची तपासणी करावी त्या प्रश्नाविषयी जरूर ती माहिती काढून घ्यावी त्याची नोंद वहीत करावी. पुरावे गोळा करावेत. + प्रश्न सोडवण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत? त्याचा शोध घ्यावा विचार करावा. तज्ञांचा सल्ला घ्यावा. लोकांना मार्ग समजावून सांगावेत. + ज्या लोकांचा प्रश्न आहे त्यांनी हालचाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या दिवशी लोक धडपड करायला तयार असतील त्याच दिवशी आपण धडपड करावी. ज्या दिवशी लोक धडपड करणार नाहीत त्या दिवशी आपणही धडपड करू नये. जी व्यक्ती संघर्षाला उभी आहे धडपड करायला तयार आहे त्या व्यक्तीला आपण संपूर्ण ताकद द्यावी. मात्र जर व्यक्ती संघर्षाला उभी नाही, धडपड करायला तयार नाही. तर आपण आपला वेळ वाया घालवू नये. +  प्रश्न सोडवताना किती लोक त्या प्रश्नाशी जोडलेले आहेत ते पहा. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घ्या. + अन्यायग्रस्त किंवा समस्या ग्रस्त व्यक्ती किंवा समूहाच्या आपल्या संघटनेच्या नावानी आमच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन तसेच प्रयत्न करावेत असा विनंती अर्ज घ्यावा. तसे न केल्यास व ऐनवेळी लोकांनी माघार घ
फिर्याद (नमुना) मा. पोलीस निरिक्षक सातारा पोलीस स्टेशन ता. जी. सातारा यांच्या समोर शुक्रवार दिनांक. ५ फेब्रुवारी २००९ रोजी समक्ष हजर राहून फिर्याद देतो कि, मी. श्री. अबक गाव कुन्द्यापानी ता. जी. सातारा येथे कुटुंबासह राहतो. माझे वय २४असून मी नवबौद्ध अनुसूचित जाती पैकी आहे. श्री. गमभ वय २१ व्यवसाय शिक्षण बी सी ए सेकंड, गांधी कॉलेजमधील एस पी इंस्टीट्युट मध्ये शिकतो. जात मराठा - बिगर अनुसूचित जातीतील असून उगाचच 'इनटीलीजंस ब्युरो' असे मला जाने २००५ पासून वारंवार चिडवतो. 'का चिडवले?' असे विचारले असता धक्काबुक्की करतो आणि दुसरयानाही चीडवण्यास प्रवृत्त करतो. आज दि. ५/२/२००९ रोजी साय. ६.०० वा. घरातून पाण्याची मोटार बंद करण्यासाठी मराठी शाळेच्या रस्त्याने चुन्चात नावाच्या शिवारात चाललो असता शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. तेव्हा गमभ ने डइफ वय १७, १२वी इयत्तेत शिकतो त्यास मला चीडवण्यास सांगितले. तेंव्हा मी गमभ ला का असे करतो? असे विचारले असता मला धक्काबुक्की केली त्यामध्ये माझा शर्ट फाटला व शर्टाची दोन्ही बटणे तुटली तरी मी काही न करता मोटार बंद करण्यास ग
ATROCITY ACT ची कलमे  क्र.                           कलम                                               अपराधाचे नाव  १.                     कलम ३(१) एक                खाण्यायोग्य नसलेला अथवा किलसवाना पदार्थ पिण्याची किंवा                                                                  खाण्याची जबरदस्ती करणे. २.                    कलम ३(१) दोन                इजा पोचवणे, अपमान करणे, किंवा त्रास देणे. ३.                    कलम ३(१) तीन                प्रतिष्ठेचा अवमान करणारी कृती  ४.                    कलम ३(१) चार                 जमीन इत्यादींची अन्यायाने वहिवाट किंवा तिच्यावर लागवड                                                                 करणे. ५.                    कलम ३(१) पाच                 जमीन, जागा, पाणी, यांच्याशी संबंधित  ६.                    कलम ३(१) सहा                भिक मागण्यास किंवा वेठ बिगारीची कामे करण्यास भाग पडणे. ७.                    कलम ३ (१) सात               मतदानाच्या हक्काबद्दल  ८.                    कलम ३(१) आठ  
Atrocity Act   आणि फिर्याद / एफ आय आर / मेडिकल   Atrocity Act संबधी फिर्याद लिहिताना संबधित व्यक्तीची जात व आरोपीची जात लिहिण्यासा विसरू नये. कोणती शिवी दिली, काय धमकी दिली, कोणते शब्द वापरले ते जसेच्या तसे लिहा. मारले असल्यास नेमके कोठे मारले, कशाने मारले ते व्यवस्थित तपशील लिहा. घटना कोणासमोर घडली, कोठे घडली त्याचे व्यवस्थित तपशील लिहा. फिर्याद दिनांक, सही,इ. करण्यास विसरू नका. फिर्यादी सोबत पिडीत व्यक्तीचे (घरातील कोणाचीही) जातीचा दाखल्याची झेरॉक्स फिर्यादि सोबत जोडावी.  फिर्याद स्वीकारताना अनेक अडचणी येवू शकतात. उदा. आज रविवार सुट्टी आहे. ऑफिस ६ वाजताच बंद होते. उद्या सकाळी या अशी उत्तरे पोलिसांकडून मिळू शकतात. लक्षात घ्या पोलीस स्टेशनला कधीही, कशाचीही, सुट्टी नसते व पोलीस स्टेशन २४ तास चालू असते. पोलिसास तसे ठणकावून सांगा. फिर्यादीची झेरॉक्स काढून झेरॉक्सवर पोच मागा . साहेब बाहेर गेलेत, साहेब आल्यावर या, पोच देणारा माणूस घरी गेलाय २ तासाने या असे उत्तर मिळाल्यास तुम्हीच पोच द्या असा आग्रह संबधित पोलिसांकडे करा. पोच मिळाल्याशिवाय पोलीस स्टेशन मधून उठू नका  काही वे
Image
स्वतंत्र ग्रामपंचायत कशी मिळवावी?  आपल्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत नसेल व आपले गाव एखाद्या ग्रुपग्रामपंचातीशी जोडलेले असेल, व ती ग्रुपग्रामपंचायत आपल्या गावाकडे नीट लक्ष देत नसल्यामुळे, आपल्या गावाचा विकास खोलम्बला असेल तर आपण स्वतंत्र ग्रामपंचायत मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो. जर आपल्या गावाची मतदार संख्या ३०० हून अधिक असेल, व आपल्या गावातील घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती इ. च्या करांच्या रूपातील उत्पादन १८०० रुपयाहून अधिक असेल तर आपणास स्वतंत्र ग्रामपंचायत मिळू शकते. त्यासाठी तसा विनंती अर्ज कलेक्टरकडे करावे लागतो. व त्यावर गावातील सर्व मतदारांच्या सह्या / अंगठे घ्यावेत. अर्जाची झेरॉक्स काढून मुल प्रत कलेक्टरला द्यावी ब झेरॉक्स वर पोच घ्यावी व अधून मधून स्वत: कार्यालयात जावून पाठपुरावा करावा.
पोच घेण्यातील अडचणी  कोणताही अर्ज कार्यालयात दिल्यानंतर त्याची पोच घेणे महत्वाचे आहे.  पोच कशी घ्यावी :  अर्ज व्यवस्थित लिहून झाल्यावर त्याची झेरॉक्स करावी. जवळपास झेरॉक्स नसेल तर कोऱ्या  कागदावर कार्बन पेपर ठेवून त्यावर दुसरा कोरा कागद ठेवून टाचणीने फीट करावा व मग अर्ज लिहावा. ओरिजिनल (मुल प्रत) अर्ज कार्यालयास द्यावी. कोणत्याही कार्यालयात बारनिशी विभाग असतो. त्या बारनिशी विभागात जावून झेरोक्स कागदावर बारनिशी विभागाचा सही  शिक्का घ्यावा. अर्ज देण्याच्या दोन पद्धती आहेत. १.  अर्ज प्रत्यक्ष अधिकाऱ्याचा  हातात देवून त्याचेकडून किंवा बारनिशी विभागातून पोच घेणे. २. अर्ज बारनिशीत देवून त्याची पोच घेणे. कार्यालय दूर असेल व तिथे जाने शक्य नसेल तर अर्ज रजिष्टर पोष्टाने पाठवावा. पाठवण्यापूर्वी अर्जाची झेरॉक्स करावी. पोच पोष्टाने येते. ती पोच पावती अर्जाला टाचनीने जोडून ठेवावी. बऱ्याचदा अर्ज स्वीकारताना पोच मागितली असता, 'साहेब बाहेर गेलेत/ संध्याकाळी पोच मिळेल', 'बारनिशी तील शिपाई बाहेर गेलाय २ तासाने परत या' अशी वाट्टेल ती उत्तरे लबाड सरकारी कर्मचारी देतील.
लाच / भ्रष्टाचार / भेसळ   कोणताही सरकारी कर्मचारी काम करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याची तक्रार ' लाच लुचपत खाते ' (Anti corruption Bureau) कडे करावी . तक्रार लेखी स्वरुपात असावी . त्याची पोच घ्यावी किंवा रजिस्टर   पोष्टाने तक्रार करावी . प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाच लुचपत ऑफिस असते . त्याच बरोबर सदर तक्रार आपण ' अध्यक्ष अध्यक्ष , भ्रष्टाचार निर्मुलन समिती ' कडे हि करू शकतो . त्याचे ऑफिस कलेक्टर ऑफिस मध्ये असते . रेशन दुकानदार किंवा किरण दुकानदार भेसळ करत असल्यास त्याची तक्रार अन्न व भेसळ खाते यांचे कडे करावी . प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचे ऑफिस असते .  तक्रार करताना शक्यतो पुरावे द्यावेत किंवा अन्न धान्याचा नमुना सादर करावा.
गावगुंड आणि ग्रामपंचायत  ग्रामपंचायतीमध्ये पंच असतात व गावात काही भानगड, तंटा बखेडा झाल्यास पंचायत बसते गाव जमा होते व पंच न्याय - निवाडा करतात. अशी पारंपारिक ग्रामपंचायतीची रचना आहे. त्यालाच थोडे आधुनिक स्वरूप देवून आजची ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. मात्र आजच्या ग्रामपंचायतीचे स्वरूप दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. गावातील गावगुंड, धनदांडगे आणि रिकाम टेकड्यांना जनतेला खुशाल पिळता यावे, यासाठीच जणू सरकारने यांना एक नवा धंदा काढून दिला आहे. या ग्रामपंचायतीमुले गावागावात गट  - तट, पार्ट्या, व भांडणे तंटे निर्माण झाले आहेत. आणि या पार्ट्यांना भांडणात गावच्या विकासाचा ठणठणाठ. गावात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून सरपंचापर्यंत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब व महिलांसाठी आरक्षण आहे. मात्र हे गावगुंड हुशारीने त्यांच्यात ऐकण्यात असणाऱ्या एखाद्या दगड्या धोंड्या किंवा गजराबाईला सरपंच म्हणून आरक्षित जागेवर बसवतात त्यांनी फक्त सह्या करायच्या कारभार गावागुंडानी पाहायचा. एखादी दलित महिला सरपंच असेल तर तिच्या नवऱ्याला ' ए, जा तुझ्या बायकोला घेवून ये, त