Posts

Showing posts from 2015

जातीअंत

जातीअंत   जात नष्ट का व्हायला हवी ?   १. साम्यवादाच्या प्रस्थापनेसाठी - मार्क्स म्हणतो ' जगातील कामगारांनो एक व्हा!' मात्र प्रश्न उभा राहतो, जगातील कामगार एक होतील का? भारतीय परिप्रेक्षात पहायचे झाले तर भारतात असणाऱ्या हजारो जाती, वर्णव्यवस्था, त्यामध्ये असणारी उचनिचता, स्पृश्यास्पृश्यता तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इ. बाबतीत असणारी विषमता, शोषण हे पाहता कामगारांमध्ये आपसात जातीवरून तेढ, द्वेष, उचनिचता, विषमता जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत भारतातील कामगार एकजूट होतील असे वाटत नाही. जोपर्यंत कामगार वर्ग एक होत नाही तोपर्यंत मार्क्सला अपेक्षित क्रांती यशस्वी होऊ शकणार नाही. परिणामी साम्यवादाची प्रस्थापना होणार नाही. आणि झालीच तरी ती क्रांती फार काळ टिकू शकणार नाही. यासाठी जातीअंत होणे अत्यंत आवश्यक आहे. २. भारताचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी -  भारताचा इतिहास पाहिल्यास प्राचिन काळापासून भारत हा परकीय सत्तेचा गुलाम राहिलेला आहे. सतत होणारी आक्रमणे आणि अपरिहार्यपणे येणारी हार व गुलामी यास आपसातील फुट, विभाजन, परस्परातील द्वेष कारणीभूत राहिलेला आहे. भारतीय लोक लढवय्य