आंबेडकर वादाचे महत्व
आंबेडकर वादाचे महत्व जनतेच शोषण हे वर्गीय आधारावर होत अस मार्क्सवादी दृष्टीकोन सांगतो. म्हणजे उत्पादन साधने कोणती, ती कोणाच्या मालकीची, कोणावर कोण अवलंबून, कसे अवलंबून, हितसंबध कसे? देवाणघेवाण कोणा कोणाची, कशी, यावर शोषणाचे प्रकार व प्रमाण अवलंबून असते. असे त्यांच्या तत्वाद्नानाचे स्वरूप आहे. हे स्वरूप वैज्ञानिक आधारावर टिकणारे असल्याने आम्हाला ते मान्यच आहे. मार्क्स म्हणतो 'जगातील कामगारानो एक व्हा!'. तो असे सांगतो कारण,भांडवलदार हे कामगारांचे शोषण करत असतात. कारखाना हा त्यांच्या मालकीचा असतो. कामगारांना कमी पगार देवून, जास्त काम करून घेवून शिल्लक राहिलेला वरकड (नफा) मालक स्वत: साठी घेत असतो. यामुळेच कामगारांच शोषण होत असत. जर कारखानाच कामगारांच्या सामुहिक मालकीचा असेल तर अशा प्रकारचे शोषण होणार नाही. या पायावर मार्क्स म्हणतो 'शोषणाचे मुल हे खाजगी मालमत्ते मध्ये आहे.' त्यासाठी तो जगातील कामगारांना एक होण्यास सांगतो. कामगार वर्गाचे नेतृत्व आणि शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व अन्य वर्ग यांची भक्कम एकजूट झाल्यावर मध्यम वर्गाला सोबत घेवून भां...