गावगुंड आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये पंच असतात व गावात काही भानगड, तंटा बखेडा झाल्यास पंचायत बसते गाव जमा होते व पंच न्याय - निवाडा करतात. अशी पारंपारिक ग्रामपंचायतीची रचना आहे. त्यालाच थोडे आधुनिक स्वरूप देवून आजची ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. मात्र आजच्या ग्रामपंचायतीचे स्वरूप दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. गावातील गावगुंड, धनदांडगे आणि रिकाम टेकड्यांना जनतेला खुशाल पिळता यावे, यासाठीच जणू सरकारने यांना एक नवा धंदा काढून दिला आहे. या ग्रामपंचायतीमुले गावागावात गट - तट, पार्ट्या, व भांडणे तंटे निर्माण झाले आहेत. आणि या पार्ट्यांना भांडणात गावच्या विकासाचा ठणठणाठ. गावात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून सरपंचापर्यंत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब व महिलांसाठी आरक्षण आहे. मात्र हे गावगुंड हुशारीने त्यांच्यात ऐकण्यात असणाऱ्या एखाद्या दगड्या धोंड्या किंवा गजराबाईला सरपंच म्हणून आरक्षित जागेवर बसवतात त्यांनी फक्त सह्या करायच्या कारभार गावागुंडानी पाहायचा. एखादी दलित महिला सरपंच असेल तर तिच्या नवऱ्याला ' ए, जा तुझ्या बायकोला घ...
Comments
Post a Comment