गावगुंड आणि ग्रामपंचायत 

ग्रामपंचायतीमध्ये पंच असतात व गावात काही भानगड, तंटा बखेडा झाल्यास पंचायत बसते गाव जमा होते व पंच न्याय - निवाडा करतात. अशी पारंपारिक ग्रामपंचायतीची रचना आहे. त्यालाच थोडे आधुनिक स्वरूप देवून आजची ग्रामपंचायत निर्माण झाली आहे.

मात्र आजच्या ग्रामपंचायतीचे स्वरूप दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. गावातील गावगुंड, धनदांडगे आणि रिकाम टेकड्यांना जनतेला खुशाल पिळता यावे, यासाठीच जणू सरकारने यांना एक नवा धंदा काढून दिला आहे. या ग्रामपंचायतीमुले गावागावात गट  - तट, पार्ट्या, व भांडणे तंटे निर्माण झाले आहेत. आणि या पार्ट्यांना भांडणात गावच्या विकासाचा ठणठणाठ.

गावात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून सरपंचापर्यंत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब व महिलांसाठी आरक्षण आहे. मात्र हे गावगुंड हुशारीने त्यांच्यात ऐकण्यात असणाऱ्या एखाद्या दगड्या धोंड्या किंवा गजराबाईला सरपंच म्हणून आरक्षित जागेवर बसवतात त्यांनी फक्त सह्या करायच्या कारभार गावागुंडानी पाहायचा. एखादी दलित महिला सरपंच असेल तर तिच्या नवऱ्याला ' ए, जा तुझ्या बायकोला घेवून ये, तिची सही पाहिजे 'असे बजावले जाते.ना तिला राज्यकारभारातल काही कळत, न कळू दिल जात, दलित पुरुष सरपंचांचीही तीच अवस्था.

एखादी सवर्ण महिला सरपंच असेल. त्यातही गावगुंडाची पत्नी सरपंच असेल तर तिच्या वतीने सरपंच म्हणून तिचा नवराच कारभार पाहतो. गाव देखील त्यालाच सरपंच म्हणून ओळखत अधिकारीही या सर्व प्रकारात सामील असतात. १५ ऑगस्ट आणे २६ जानेवारीला साधे झेंडावंदनही या आरक्षित सरपंचाच्या हस्ते करू दिले जात नाही.

गावगुंडाच्या गुंडगिरीपुढे सामान्यांचे काहीच चालत नाही. यासाठी उपाय एकच. सर्व गावकरयांनी जागृत होवून सर्व ग्रामसभेस हजर रहावे. आपल्या म्हणण्याप्रमाणे ठराव करावेत. मागील कामकाजाचा आढावा घ्यावा निर्भयपणे ग्रामसभेत सरपंचाना प्रश्न विचारावेत. त्यांची उलट तपासणी घ्यावी.

सभ्य, सज्जन, हुशार, सुशिक्षित, कर्तबगार व चारित्र्यवान माणसाना निवडणुकीत उभे करावे व निवडून द्यावे. गावच्या कारभारात प्रत्येकाने लक्ष घालावे हे जमत नसेल तर या ग्रामपंचायती बंद करायला तरी किमान शासनास बजावाव ते हि ग्रामसभेचा ठराव घेवून.




Comments

  1. स्मरणपत्र.

    राजापुर : धाऊलवल्लि (तेलिवाडी) ग्रामपंचायत हद्दीतील धोंडू भिकाजी राणे यांच्या घराचा फेरफार करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला फेरफार अवैध असून तो रद्द करावा, अशी मागणी मी धनंजय मनोहर राणे( धोंडू भिकाजी राणे यांचा नातू ) करीत आहे. याबाबत मी माननीय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद् रत्नागिरी यांना कळकळीचे निवेदन सादर करीत आहे.

    माझे आजोबा कै धोंडू भिकाजी राणे ह्यांच्या नावे मौजे धाऊलवल्लि येथे 1948 ते 1967 नमूना 8 नियम 32।1अससेमेंट लिस्ट उतारा जोडल्याप्रमाने आमच्या आजोबांचे घर होते भोगवट नाव खुद्द जुना घर न २४३ नविन घर न ३६९ आहे . माझ्या आजोबांच्या मृत्युपश्चात हे घर त्याच्या वारसांच्या नावे झाले पाहिजे होते परतु ग्राम्पचायातिने रामचंद्र भिकाजी राणे (धोंडू भिकाजी राणे याचे छोटे भाऊ ) याच्या नावावर कोणताही फेरफार न करता असेसमेंट वरील नाव बदल अवैध पध्दतिने केले.
    आमच्या आजोबांनी (धोंडू भिकाजी राणे ) यांनि 1967।1970 या काळात घर बांधले होते व् ते कामाकरिता मुंबई येथे कुटूंबासहित वास्तव्य करीत होते.त्यांच्या नकळत त्याचे नाव रद्द करून त्या ठिकाणी त्यांचे छोटे भाऊ रामचंद्र भिकाजी राणे याचे नाव कोणताही फेरफार न करता चुकीच्या पद्धतीने चडविन्यात आले ग्रामपंचायत कार्यालय धाऊलवल्ली पत्र जा क्र। ग्रा प धा -135/2015 दिनाक - 09/12/2015 सदर फेरफारसबंधी ठराव अगद कागदपत्रे नाहीत.धोंडू भिकाजी राणे यांचा मुत्यु 26/10/1976 ला झाला. त्यानंतर 7/12 वर 1980 ला परस्पर वारसांची नावे घालुन रामचंद्र भिकाजी राणे यानि स्वताला एकत्र कुटुंब पुरुष जोडले.वारसाना नोटीसा न पाटविता तलाठी कार्यालायने देखिल धोंडू भिकाजी राणे यांचे मुत्यु प्रमाणपत्र न मागता रामचंद्र भिकाजी राणे यांना एकत्र कुटुंब पुरुष बनविले.
    सहा क प्रमाने
    1 । मनोहर धोंडू राणे
    2 । गंगू धोंडू राणे
    3 । चंद्रकांत धोंडू राणे
    4 । रामचन्द्र भिकाजी राणे ( एकत्र कुटुंब पुरुष )

    पण धोंडू भिकाजी राणे यांची पत्नी जानकीबाई धोंडू राणे याची नोंद केली नाही ? वारस तपास बरोबर केला नाही.

    मौजे धाऊलवल्लि येथील घराचे वर्णन
    घर नंबर 243 जुना /369 नविन
    खुद्द कै.धोंडू भिकाजी राणे ।
    घर-तेलीवाडी
    अससमेंट उतारा 1951 -1952
    कै धोंडू भिकाजी राणे ह्यांचे निधन 26/10/1976 साली झाले. त्यांच्या मृत्युचा दाखला अनुक्रमांक 88435- 3534 तारीख :- 30/10/1976 हा सोबत जोडलेला आहे. असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
    क्र.नांव
    मयताशी नाते
    १.कै.मनोहर धोंडू राणे
    मुलगा
    २.कै.सुमति रामचंद्र बाकाळकर
    मुलगी
    ३.श्री.चंद्रकांत धोंडू राणे
    मुलगा
    या घराचा ग्रामपंचायतीने 1967 ते 1980 मध्ये कोणत्याही प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध न करता बेकायदा फेरफार केला. ग्रा.पं. प्रशासनाने घेतलेला अवैध फेरफार रद्द करावा, अशी मागणी मी धनंजय मनोहर राणे या निवेदनातून करीत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने १५ दिवसांत योग्य न्याय दयावा.निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी आणि ग्रा.पं. सरपंच यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.


    (धनंजय मनोहर राणे)
    9029944937

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामसभा

जातीअंत