स्वतंत्र ग्रामपंचायत कशी मिळवावी? 


आपल्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत नसेल व आपले गाव एखाद्या ग्रुपग्रामपंचातीशी जोडलेले असेल, व ती ग्रुपग्रामपंचायत आपल्या गावाकडे नीट लक्ष देत नसल्यामुळे, आपल्या गावाचा विकास खोलम्बला असेल तर आपण स्वतंत्र ग्रामपंचायत मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो.

जर आपल्या गावाची मतदार संख्या ३०० हून अधिक असेल, व आपल्या गावातील घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती इ. च्या करांच्या रूपातील उत्पादन १८०० रुपयाहून अधिक असेल तर आपणास स्वतंत्र ग्रामपंचायत मिळू शकते.

त्यासाठी तसा विनंती अर्ज कलेक्टरकडे करावे लागतो. व त्यावर गावातील सर्व मतदारांच्या सह्या / अंगठे घ्यावेत. अर्जाची झेरॉक्स काढून मुल प्रत कलेक्टरला द्यावी ब झेरॉक्स वर पोच घ्यावी व अधून मधून स्वत: कार्यालयात जावून पाठपुरावा करावा.

Comments


  1. माझ्या गावची पण ग्रुप ग्रामपंचायत आहे ती स्वतंत्र करायची आहे काय करावे लागेल गावची लोकसंख्या 720 आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामसभा

जातीअंत