Atrocity Act 

 आणि फिर्याद / एफ आय आर / मेडिकल  

Atrocity Act संबधी फिर्याद लिहिताना संबधित व्यक्तीची जात व आरोपीची जात लिहिण्यासा विसरू नये. कोणती शिवी दिली, काय धमकी दिली, कोणते शब्द वापरले ते जसेच्या तसे लिहा. मारले असल्यास नेमके कोठे मारले, कशाने मारले ते व्यवस्थित तपशील लिहा. घटना कोणासमोर घडली, कोठे घडली त्याचे व्यवस्थित तपशील लिहा. फिर्याद दिनांक, सही,इ. करण्यास विसरू नका. फिर्यादी सोबत पिडीत व्यक्तीचे (घरातील कोणाचीही) जातीचा दाखल्याची झेरॉक्स फिर्यादि सोबत जोडावी. 

फिर्याद स्वीकारताना अनेक अडचणी येवू शकतात. उदा. आज रविवार सुट्टी आहे. ऑफिस ६ वाजताच बंद होते. उद्या सकाळी या अशी उत्तरे पोलिसांकडून मिळू शकतात. लक्षात घ्या पोलीस स्टेशनला कधीही, कशाचीही, सुट्टी नसते व पोलीस स्टेशन २४ तास चालू असते. पोलिसास तसे ठणकावून सांगा.

फिर्यादीची झेरॉक्स काढून झेरॉक्सवर पोच मागा . साहेब बाहेर गेलेत, साहेब आल्यावर या, पोच देणारा माणूस घरी गेलाय २ तासाने या असे उत्तर मिळाल्यास तुम्हीच पोच द्या असा आग्रह संबधित पोलिसांकडे करा. पोच मिळाल्याशिवाय पोलीस स्टेशन मधून उठू नका 

काही वेळा फिर्याद बाजूला ठेवून अदखलपात्र प्राथमिक माहिती अहवाल लिहायला बसतील. त्यास एन. सी. म्हणतात. तसे केल्यास त्यावर सही करू नका. एफ. आय. आर. चा आग्रह धरा.

फिर्यादिमध्येच कलमे टाकून घ्या. व फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे कलमे लावण्यास भाग पाडा. त्याशिवाय उठणार नाही हि भूमिका घ्या. घटना घडल्या बरोबर ताबडतोब पोलीस स्टेशनला जा. (२४ तासाच्या आत) जाताना अंघोळ करू नका, तोंड धुवू नका, केस विंचरू नका, कपडे चप्पल बदलू नका. मारहाण, विनयभंग, बलात्कार झाला त्यावेळी जशी परिस्थिती होती त्याच परिस्थितीत पोलीस स्टेशनला जा.

फिर्यादीचीची पोच व एफ आय आर ची झेरॉक्स मागून घ्या व मेडिकल पत्र तयार करण्यास सांगा. ते मेडिकल पत्र त्यांचेकडून घ्या. त्याची झेरॉक्स काढा व सरकारी दवाखान्यात जावून तपासणी करा. तिथला पोलीस उद्या या वगैरे म्हणल्यास ऐकू नका. ताबडतोब मेडिकल करून घ्या.त्या पत्राची शक्यतो झेरॉक्स काढून घ्या. सदर पत्र सरकारी दवाखान्यात दिल्यावर त्याची नोंद होते. तपासणी झाल्यावर त्याचा अहवाल (चिट्ठी) मिळते. ती ताब्यात घ्या. जर मेडिकल पत्र मिळाले नाही तर सरकारी दवाखान्यात तपासतही नाहीत व अहवालही देत नाहीत असा अनुभव आहे. तसे झाल्यास खाजगी दवाखान्यातून तपासणी करून तसा अहवाल घ्यावा.

केस चालू झाल्यापासून जे - जे लोक धमकावतील, त्रास देतील त्यांची नावे केसमध्ये समाविष्ट करत जा. तंटामुक्ती समितीचा Atrocity Act च्या केसमध्ये काहीही संबध नाही. त्यांनी जर अडवणूक  केली तर त्यानाही केस मध्ये समाविष्ट करा. जे जे तक्रारी मध्ये अडचणी आणतील त्यांचे विरुद्ध पोलिसात व त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रारी करत जा व पोच घेत जा. 

Comments

  1. सर मला रविवार दि.14 ऑक्टोबर 2018 या रात्री मराठा समाज्याच्या 7 ते 8 जणांनी किरकोळ कारणावरून मला बेदम मारहाण केली आहे तरी मी हिंदू महार या जातीचा असून मला आता त्यांच्यावर हि केस करता येइल का माझ्या वडिलांचा जातीचा दाखला कर्नाटकचा आहे तरी मला सहकार्य करावे ही विनंती

    ReplyDelete
  2. सुनील संगप्पा चांगुणे
    सर मला रविवार दि.14 ऑक्टोबर 2018 या रात्री मराठा समाज्याच्या 7 ते 8 जणांनी किरकोळ कारणावरून मला बेदम मारहाण केली आहे तरी मी हिंदू महार या जातीचा असून मला आता त्यांच्यावर हि केस करता येइल का माझ्या वडिलांचा जातीचा दाखला कर्नाटकचा आहे तरी मला सहकार्य करावे ही विनंती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामसभा

जातीअंत