फिर्याद (नमुना)

मा. पोलीस निरिक्षक सातारा पोलीस स्टेशन ता. जी. सातारा यांच्या समोर शुक्रवार दिनांक. ५ फेब्रुवारी २००९ रोजी समक्ष हजर राहून फिर्याद देतो कि,

मी. श्री. अबक गाव कुन्द्यापानी ता. जी. सातारा येथे कुटुंबासह राहतो. माझे वय २४असून मी नवबौद्ध अनुसूचित जाती पैकी आहे.

श्री. गमभ वय २१ व्यवसाय शिक्षण बी सी ए सेकंड, गांधी कॉलेजमधील एस पी इंस्टीट्युट मध्ये शिकतो. जात मराठा - बिगर अनुसूचित जातीतील असून उगाचच 'इनटीलीजंस ब्युरो' असे मला जाने २००५ पासून वारंवार चिडवतो. 'का चिडवले?' असे विचारले असता धक्काबुक्की करतो आणि दुसरयानाही चीडवण्यास प्रवृत्त करतो.

आज दि. ५/२/२००९ रोजी साय. ६.०० वा. घरातून पाण्याची मोटार बंद करण्यासाठी मराठी शाळेच्या रस्त्याने चुन्चात नावाच्या शिवारात चाललो असता शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. तेव्हा गमभ ने डइफ वय १७, १२वी इयत्तेत शिकतो त्यास मला चीडवण्यास सांगितले. तेंव्हा मी गमभ ला का असे करतो? असे विचारले असता मला धक्काबुक्की केली त्यामध्ये माझा शर्ट फाटला व शर्टाची दोन्ही बटणे तुटली तरी मी काही न करता मोटार बंद करण्यास गेलो. मोटार बंद करून आल्यानंतर त्याने श्री. विठ्ठल रखुमाई मदिरा शेजारी पिंपळाच्या झाडाखाली अडवले. व विचारले का रे तुला मस्ती आली काय? 'माझ्या नडला लागू नकोस, तेंव्हा मी घरी जात असताना त्याने मला पोटात लाथ मारली, डाव्या गालात बुक्की मारली,नंतर मानेवर फटका देवून जोराने मान आवळली व फिरवली. व मला गमभ ने धमकी दिली - 'तू घावच साताऱ्यात, भेट मला, जीवच घेईन तुझा' व असे म्हणून मला दगडाने मारण्यासाठी धावत माझा पाठलाग केला व मी तसाच धावत पळत साताऱ्यास आलो आहे.

भर रस्त्यात सर्वांच्या समोर सर्वांना दिसेल अशा पद्धतीने मारहाण झाली असल्याने मी अपमानित झालो आहे. तरी त्याचेवर अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती अत्याचार प्रतीम्बधक कायदा १९८९ प्रमाणे कलम ३(१)दोन, ३(१)तीन, प्रमाणे गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे. तसेच इंडियन पिनल कोड प्रमाणे गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे. शिवाय गमभ वर अट्रोसिटी अक्ट कलम ३(१) दहा व ३(२)पाच प्रमाणे गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे.

म्हणून मी गमभ विरुद्ध हि फिर्याद देत आहे ती आपण दाखल करून घ्यावी. फिर्याद मी सांगितल्याप्रमाणे असून ती खरी आहे.

                                                                                                         अ. ब. क.

                                                                                                     अर्जदाराची सही 

Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा

जातीअंत