स्वप्रयत्न

माणूस मागे राहिला, याला दोन करणे असतात. एक म्हणजे व्यवस्थेनी त्याला मागे ठेवला, आणि दुसरे म्हणजे त्याच्या दुर्गुनामुळे तो मागे राहिला. कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता हे.  मला जर साताऱ्यातून पुण्याला जायचे असेल तर मला सातारा सोडावा लागेल. सातारा न सोडता मी पुण्याला जावू शकणार नाही. तसेच मागासालेपानाशी जोडलेल्या बाबींचा त्याग केल्या शिवाय प्रगतीचा हात धरता येणार नाही. बाबासाहेबांचा लढा हा बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारलेला आहे. बुद्धाने जगाचे अस्तित्व मान्य केले. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, पूर्वजन्म, पुनर्जन्म या संकल्पना नाकारल्या. त्याने सांगितले. १. जगात दु:ख आहे. २. दु:खाला काही तरी कारण आहे. ३. जर दु:खाचे  कारण आपण दूर केले ४. तर दु:ख दूर होईल

त्या काळाला अनुसरून त्याने दु:खाची १२ कारणे सांगितली. व ती दूर करण्याचा सल्ला दिला. बाबासाहेबांनी हेच तत्वज्ञान  दलितांच्या दु:खाला लागू केले. त्यांच्या दु:खाची कारणे शोधून ती दूर करणे हा त्यांच्या लढ्याचा मार्ग राहिलेला आहे.

माझी जात, माझा धर्म, माझा परंपरागत व्यवसाय, माझे अज्ञान / निरक्षरता, माझे अस्वछ / घाणेरडे राहणीमान, माझा शिवाराळपणा, माझे व्यसन, माझ्यातील अंधश्रद्धा, माझे गाव, इ. बाबी माझ्या मागासलेपनाला जर कारणीभूत असतील, माझ्या दु:खाचे कारण असतील तर मी त्याचा त्याग करायला हवा. यासाठीच शहराकडे चला, बौद्ध धर्मांतर, शिका संघटीत व्हा संघर्ष करा चा नारा, मेलेली गुरे ढोरे ओढायची नाहीत, गावकीची कामे करायची नाहीत, महाडच्या सत्याग्रहात स्वछ राहणीचा (स्वछ अंघोळ करा, केस विंचरा, स्वछ धुतलेले कपडे घाला) हा आदेश त्यांनी दिला. म्हणूनच प्रत्येकांनी आपापल्या दुखाची कारणे दूर करण्याचा प्रयत्न करणे हे व्यवस्था परीवर्तना इतकेच महत्वाचे आहे.

स्वातंत्र्याचा दुसरा अर्थ स्वावलंबन देखील आहे. ज्यावेळी काळ्या निग्रोना १ जानेवारी रोजी अब्राहम लिंकनने गुलामीतून मुक्त केले. त्यावेळी काल्याणी अब्राहम लिंकनला शिव्या दिल्या. कारण त्यांना इथून पुढे त्यांचे घर, जेवण, कपडे,आजारपणे इ. साठी स्वत: ची व्यवस्था स्वत: करायची होती. ज्याला गुलामीतून मुक्त व्हायचे आहे त्याने स्वावलंबनाचा  मार्ग धरायला हवा व परावलंबी जीवनाचा त्याग करायला हवा.


Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा

जातीअंत