मानवी हक्क 

माणूस जोपर्यंत गुलामीत धन्यता मानतो तोपर्यंत त्याचे लाड होतात. ज्यावेळी तो गुलामीचा त्याग करतो त्यावेळी त्याचेवर अत्याचार होतात. बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो स्वत:च बंड  करून उठेल. आणि हे बंड  भारतीय राज्यघटना व युनोनी दिलेल्या मानवी हक्कांच्या आधारे करणे शक्य असल्याने मानसिक गुलामीतून मुक्तता आणि मानवी हक्कांचा आग्रह याकडेही पुरेशा गांभीर्याने पाहायला हवे.

धर्म म्हणतो 'ढोर शुद्र गंवार और नारी यह सब ताडन के अधिकारी' गुलामीला नकार दिल्यावर अत्याचार ठरलेले आहेत म्हणून मानवी हक्कांच्या हननाविषयी आपण पुरेसे गंभीर असायला हवे.

वरील वैचारिक भूमिकेतून मानव मुक्ती अभियानाची रणनीती व कार्यक्रम आखले गेले आहेत. ते पुढील प्रमाणे.
                      १.  मूल्य परिवर्तन                 -   बुद्ध धम्म व विवेक वाद
                      २. व्यवस्था परिवर्तन             -  मार्क्स वाद
                      ३. भेद निर्मुलन                      - ( जाती अंत, वर्ग अंत, स्त्री दास्य मुक्तता, धार्मिक / प्रादेशिक /
                                                                        वांशिक भेद निर्मुलन)
                       ४. स्वविकासासाठी  स्वप्रयत्न
                       ५. मानवी हक्क

भारतीय शोषण व्यवस्थेची गुंतागुंत पाहता वरील बाबींवर काम झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने मानव मुक्ती होणार नाही. जर १०० % समाजाने बुद्ध धम्म किंवा विवेक वाद स्वीकारला पण व्यवस्था जर भांडवली / सरंजामी असेल तर शोषण होत राहणार. जर व्यवस्था कम्युनिष्ट असेल आणि लोकांचा धर्म, रिती रिवाज बुरसटलेले, शोषणाला प्रोत्साहन देणारे असतील तर हुकुमशाहीचा दंडुका ढिला होताच परत जुनी व्यवस्था प्रस्थापित होईल. भेद नष्ट झाल्याशिवाय कामगार एक होणार नाहीत व क्रांतीही होणार नाही झाली तर टिकणार नाही. लोकांनि स्वत:तील मागासले पनाशी चिकटलेल्या गोष्टी व दुर्गुण त्यागल्या शिवाय हुकुमशाहीचा दंडुका ढिला करणे म्हणजे शोषण करणारी शाषण संस्था नव्याने आणण्याला प्रोत्साहन ठरेल. लोक स्वत:च्या व इतरांच्या मानवी हक्कांबाबत सजग असल्याशिवाय शोषण दूर होणार नाही. 

Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा