मानव मुक्ती
मानव मुक्ती माणूस जोपर्यंत गुलामीत धन्यता मानतो तोपर्यंत त्याचे लाड होतात. ज्यावेळी तो गुलामीचा त्याग करतो त्यावेळी त्याचेवर अत्याचार होतात. बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो स्वत:च बंड करून उठेल. आणि हे बंड भारतीय राज्यघटना व युनोनी दिलेल्या मानवी हक्कांच्या आधारे करणे शक्य असल्याने मानसिक गुलामीतून मुक्तता आणि मानवी हक्कांचा आग्रह याकडेही पुरेशा गांभीर्याने पाहायला हवे. धर्म म्हणतो 'ढोर शुद्र गंवार और नारी यह सब ताडन के अधिकारी' गुलामीला नकार दिल्यावर अत्याचार ठरलेले आहेत म्हणून मानवी हक्कांच्या हननाविषयी आपण पुरेसे गंभीर असायला हवे. वरील वैचारिक भूमिकेतून मानव मुक्ती अभियानाची रणनीती व कार्यक्रम आखले गेले आहेत. ते पुढील प्रमाणे. १. मूल्य परिवर्तन - बुद्ध धम्म व विवेक वाद २. व्यवस्था परिवर्तन ...