Posts

Showing posts with the label Indian Constitution

गणतंत्र

Image
  गणतंत्र दिवस अर्थात Republican Day हा दर दिवशी २६ जानेवारीला आपण साजरा करतो. आज या गणतंत्र दिवसाला ६९ वर्ष पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाने राज्यघटनेचा स्वीकार केला. आणि २६ जानेवारी १९५० ला आपला देश स्वायत्त गणराज्य म्हणून घोषित करण्यात आला. मात्र अनेक लोकांना आजही स्वातंत्र्य दिवस आणि गणतंत्र दिवस यातला फरक कळत नाही. हे वास्तव आहे. अर्थात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र दिन आहे. या दिवशी भारतास इंग्रजांपासून स्वातंत्र मिळाले. मात्र तरीही २६ जानेवारी हा खरा स्वातंत्र दिन आहे असे मला वाटते. कारण या दिवसा पासून राज्यघटना अमलात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस महान परिश्रम केले. आणि ही राज्यघटना अस्तित्वात आली.   राज्यघटना म्हणजे नेमक काय गणित आहे जे मला कळतंय त्या प्रमाणे मांडण्याचा प्रयत्न इथे करत आहे. 1.      मुलभूत हक्क राज्यघटनेनी भारतीय नागरिकास मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. १. समानतेचा हक्क. २. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क ३. शोषणापासून संरक्षणाचा हक्क ४. धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क ५. सांस्कृतिक व श...