Posts

Showing posts from September, 2026

व्यक्तिमत्व विकास

Image
  व्यक्तिमत्व विकास हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्वाचा भाग आहे. नुसत्या डिग्रीचा स्वविकासामध्ये फारसा उपयोग नाही. त्याला अजूनही काही विशेष प्रयत्नांची जोड लागेल. ही जोड व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणेल. लक्षात घ्या व्यक्ती नुसार हे प्रयत्न बदलतात. दुसरा जे करतो तेच करायला आपण गेलो की आपली फसगत होते. जीवन दिशाहीन आणि भरकटत जाते. त्यासाठी आपण नेमके काय करायला हवे याची अचूक जाण हवी. स्वप्न सर्व प्रथम आपण स्वत:साठी एक स्वप्न बघावे. अजून ५ वर्षांनी किंवा १० वर्षांनी मी कसा असेल? काय करत असेल? यामध्ये शिक्षण, पैसा, कुटुंब, नोकरी / व्यवसाय, आरोग्य, कौशल्य, आपले दिसणे इ. बारीक सारीक बाबींचा समावेश करावा. ही एक प्रकारची आपल्या स्वप्नांची यादीच असेल. आणि मग आपले यापुढचे आयुष्य मग आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी घालवावे. आपल्या स्वप्नांशी अगदी एकरूप व्हावे. त्यासाठी अविरत मेहनत घ्यावी. अगदी वेडे होवून जावे. स्वप्नांना सत्यात उतरवायचे तर स्वत:मध्ये बदल घडवायला हवा. त्यासाठी स्वत:ची ओळख व्हायला हवी. आणि बदल करण्याची दिशा ठरायला हवी. मात्र कशी? चला त...

इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे.

Image
  इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे. हा लेख जानेवारी २००५ मध्ये दैनिक सम्राट आणि क्रांतिसिंह या वृत्तपत्रांमध्ये मध्ये छापून आला होता. आजही हा लेख संभाजी भिडे आणि भीमा कोरेगाव या ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या लेखाचे पुन:मुद्रण करत आहे. इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे. दुर्गा दौड, ब्राह्मण दौड, शिव दौड, धारतीर्थ यात्रा अशी नावे घेवून ही यात्रा कोणता संदेश देते? देशप्रेमाचा? धर्मनिरपेक्षतेचा? की दहशतीचा? हजारो युवकांना बेकारी विषमता दारिद्रयाविरुद्ध लढण्याचे बळ न देता, शिक्षण न देता, इतरांच्या विरुद्ध चिथावणी देणारी ही यात्रा तिचे अंतर्गत हेतू, तिचा असली चेहरा, इथले पोलीस खाते, शासन तपासणार आहे का? ही घंटा यात्रेत मला ऐकावयास मिळाली. म्हणून हे मनोगत मांडत आहे. धारातीर्थयात्रेचे कसले तरी पत्रक २ मुळे झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात आलेली. उन्हातान्हाने मळकटलेले कपडे व तसेच चेहरे देखील. कमरेला शेला बांधलेला हा मुलगा मला अगदी खेड्यातला व शहरात कसे राहावे हे कळत नसावे असा वाटला. त्यांनी दिलेले पत्रक वाचत होतो. शिवाजी महाराजांचा फोटो त्या पत्रकावर आणि काहीबाही मजकूर. निरनि...