हिजडा, छक्का, छिनाल, रांड
हिजडा, छक्का, छिनाल, रांड हे शब्द आपण शिवी म्हणून वापरणे सोडणार आहोत की नाही ? दुष्ट, कपटी, गुन्हेगार, वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना उद्देशून असे शब्द प्रयोग केले जातात. बऱ्याचदा शोषित, दलित घटकातील व्यक्ती ही जेंव्हा राग अनावर झाल्यावर शोषक वर्गाला उद्देशून असे शब्द प्रयोग करतात तेंव्हा फार दु:ख होते. खरेच हिजडे किंवा छिनाल स्त्रिया या दुष्ट, कपटी असतात का? जर नसतात तर दुष्टांना उद्देशून हे शब्द वापरणे म्हणजे हिजडे आणि वैश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा अपमान नव्हे काय? खरेतर या व्यक्तींनी स्वत:च्या व्यक्तिस्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी सर्वात जास्त किंमत मोजलेली असते. त्यांचे जीवन आणि आणि केलेला त्याग, भोगलेल्या यातना पाहिल्या की मुख्य वर्गातील आपण लोक प्रथा, परंपरा, समाज यांचा विचार करत बसून आपले आयुष्य एका मानसिक गुलामीत घालवतो. त्यावेळी जाणवते. पोरे जन्माला घातली म्हणजे कोणी मर्द होत नाही आणि हातात बांगड्या भरल्या म्हणून कोणी नामर्द होत नाही. त्यासाठी अंगात धमक लागते. घर, कुटुंब, समाज यांची गुलामी झुगारून स्वत:ला हवे तसे जगण्यासाठी तेवढा दम लागतो. तेवढे मानसिक बळ लाग...