Posts

Showing posts with the label Dr. B.R. Ambedkar

अस्पृश्य मुळचे कोण?

Image
  अस्पृश्य मुळचे कोण हे पुस्तक बाबासाहेबांनी १९४८ मध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या ‘आजचे शुद्र पूर्वीचे कोण?’ या प्रबंधाचाच हा उत्तरार्ध होय. बऱ्याचदा वाचक दोन्ही पुस्तकांना एकच समजतात. मात्र शुद्र म्हणजे आजचा ओबीसी वर्ग होय. आणि अस्पृश्य म्हणजे दलित किंवा अनुसूचित जाती होय. पुस्तक वाचण्यापूर्वी हे समजून घेणे गरजेचे आहे. भूमिका शुद्र हा हिंदू संस्कृतीतील चौथा वर्ण होय. त्या व्यतिरिक्त गुन्हेगार जमाती, आदिवासी जमाती आणि अस्पृश्य मानलेल्या जाती असे अजून तीन वर्ग या संस्कृतीत आहेत की जे अत्यंत तिरस्करणीय बाब आहेत. असे बाबासाहेब म्हणतात. अस्पृश्यतेच्या दोन कारणांवर त्यांनी इथे प्रकाश टाकला आहे. १. ब्राह्मण लोक बौद्धांचा जसा तिरस्कार करतात तसाच तिरस्कार अस्पृश्य जातींचा देखील करतात. २. इतरांनी गोमांस भक्षणाचा त्याग केला तरी अस्पृश्य जातींनी गोमांस भक्षण सुरु ठेवले. भाग – १ १.       अहिंदूतील अस्पृश्यता विटाळ, भ्रष्टता, बाटणे आणि अशा विटाळातून मुक्त होण्याची भावना अस्पृश्यतेमध्ये अंतर्भूत असल्याचे बाबासाहेब या ठिकाणी मांडतात. या प्रकरणामध्ये आदिम आणि पुर...