फिर्याद (नमुना) मा. पोलीस निरिक्षक सातारा पोलीस स्टेशन ता. जी. सातारा यांच्या समोर शुक्रवार दिनांक. ५ फेब्रुवारी २००९ रोजी समक्ष हजर राहून फिर्याद देतो कि, मी. श्री. अबक गाव कुन्द्यापानी ता. जी. सातारा येथे कुटुंबासह राहतो. माझे वय २४असून मी नवबौद्ध अनुसूचित जाती पैकी आहे. श्री. गमभ वय २१ व्यवसाय शिक्षण बी सी ए सेकंड, गांधी कॉलेजमधील एस पी इंस्टीट्युट मध्ये शिकतो. जात मराठा - बिगर अनुसूचित जातीतील असून उगाचच 'इनटीलीजंस ब्युरो' असे मला जाने २००५ पासून वारंवार चिडवतो. 'का चिडवले?' असे विचारले असता धक्काबुक्की करतो आणि दुसरयानाही चीडवण्यास प्रवृत्त करतो. आज दि. ५/२/२००९ रोजी साय. ६.०० वा. घरातून पाण्याची मोटार बंद करण्यासाठी मराठी शाळेच्या रस्त्याने चुन्चात नावाच्या शिवारात चाललो असता शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. तेव्हा गमभ ने डइफ वय १७, १२वी इयत्तेत शिकतो त्यास मला चीडवण्यास सांगितले. तेंव्हा मी गमभ ला का असे करतो? असे विचारले असता मला धक्काबुक्की केली त्यामध्ये माझा शर्ट फाटला व शर्टाची दोन्ही बटणे तुटली तरी मी काही न करता मोटार बंद करण्यास ग...
Posts
Showing posts with the label कायदा