लाच / भ्रष्टाचार / भेसळ कोणताही सरकारी कर्मचारी काम करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याची तक्रार ' लाच लुचपत खाते ' (Anti corruption Bureau) कडे करावी . तक्रार लेखी स्वरुपात असावी . त्याची पोच घ्यावी किंवा रजिस्टर पोष्टाने तक्रार करावी . प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाच लुचपत ऑफिस असते . त्याच बरोबर सदर तक्रार आपण ' अध्यक्ष अध्यक्ष , भ्रष्टाचार निर्मुलन समिती ' कडे हि करू शकतो . त्याचे ऑफिस कलेक्टर ऑफिस मध्ये असते . रेशन दुकानदार किंवा किरण दुकानदार भेसळ करत असल्यास त्याची तक्रार अन्न व भेसळ खाते यांचे कडे करावी . प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचे ऑफिस असते . तक्रार करताना शक्यतो पुरावे द्यावेत किंवा अन्न धान्याचा नमुना सादर करावा.
Posts
Showing posts with the label भेसळ