लाच / भ्रष्टाचार / भेसळ 

कोणताही सरकारी कर्मचारी काम करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याची तक्रार 'लाच लुचपत खाते' (Anti corruption Bureau) कडे करावी. तक्रार लेखी स्वरुपात असावी. त्याची पोच घ्यावी किंवा रजिस्टर  पोष्टाने तक्रार करावी. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाच लुचपत ऑफिस असते.

त्याच बरोबर सदर तक्रार आपण 'अध्यक्ष अध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मुलन समिती' कडे हि करू शकतो. त्याचे ऑफिस कलेक्टर ऑफिस मध्ये असते.

रेशन दुकानदार किंवा किरण दुकानदार भेसळ करत असल्यास त्याची तक्रार अन्न भेसळ खाते यांचे कडे करावी. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचे ऑफिस असते

तक्रार करताना शक्यतो पुरावे द्यावेत किंवा अन्न धान्याचा नमुना सादर करावा.

Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा