पोच घेण्यातील अडचणी
कोणताही अर्ज कार्यालयात दिल्यानंतर त्याची पोच घेणे महत्वाचे आहे.
पोच कशी घ्यावी :
अर्ज व्यवस्थित लिहून झाल्यावर त्याची झेरॉक्स करावी. जवळपास झेरॉक्स नसेल तर कोऱ्या कागदावर कार्बन पेपर ठेवून त्यावर दुसरा कोरा कागद ठेवून टाचणीने फीट करावा व मग अर्ज लिहावा.
ओरिजिनल (मुल प्रत) अर्ज कार्यालयास द्यावी. कोणत्याही कार्यालयात बारनिशी विभाग असतो. त्या बारनिशी विभागात जावून झेरोक्स कागदावर बारनिशी विभागाचा सही शिक्का घ्यावा.
अर्ज देण्याच्या दोन पद्धती आहेत.
१. अर्ज प्रत्यक्ष अधिकाऱ्याचा हातात देवून त्याचेकडून किंवा बारनिशी विभागातून पोच घेणे.
२. अर्ज बारनिशीत देवून त्याची पोच घेणे.
कार्यालय दूर असेल व तिथे जाने शक्य नसेल तर अर्ज रजिष्टर पोष्टाने पाठवावा. पाठवण्यापूर्वी अर्जाची झेरॉक्स करावी. पोच पोष्टाने येते. ती पोच पावती अर्जाला टाचनीने जोडून ठेवावी.
बऱ्याचदा अर्ज स्वीकारताना पोच मागितली असता, 'साहेब बाहेर गेलेत/ संध्याकाळी पोच मिळेल', 'बारनिशी तील शिपाई बाहेर गेलाय २ तासाने परत या' अशी वाट्टेल ती उत्तरे लबाड सरकारी कर्मचारी देतील. व तुम्हाला वाटेला लावतील त्यांच्या भूलाथापांना बळी पडू नका. 'मला पोच द्या, पोच मिळेपर्यंत मी इथून जाणार नाही.' अशी ताठर भूमिका घ्या. मगच पोच मिळेल.
अत्यंत महत्वाचे
पोच घेतली नाही तर तुमचा अर्ज १०० % कचऱ्याच पेटीत जाणार आहे हे लक्षात असू द्या.
काही ठिकाणी अर्ज सादर केल्यावर टोकण मिळते. ते टोकण अर्जाच्या झेरॉक्सला चिकटवा. व पोच पावती, टोकण, अर्जाची झेरॉक्स फाईलला व्यवस्थित लावून ठेवा.

Comments
Post a Comment