आंदोलनाच्या पायऱ्या 


+ आंदोलन करताना नेमका प्रश्न काय आहे? त्याची तपासणी करावी त्या प्रश्नाविषयी जरूर ती माहिती काढून घ्यावी त्याची नोंद वहीत करावी. पुरावे गोळा करावेत.

+ प्रश्न सोडवण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत? त्याचा शोध घ्यावा विचार करावा. तज्ञांचा सल्ला घ्यावा. लोकांना मार्ग समजावून सांगावेत.

+ ज्या लोकांचा प्रश्न आहे त्यांनी हालचाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या दिवशी लोक धडपड करायला तयार असतील त्याच दिवशी आपण धडपड करावी. ज्या दिवशी लोक धडपड करणार नाहीत त्या दिवशी आपणही धडपड करू नये. जी व्यक्ती संघर्षाला उभी आहे धडपड करायला तयार आहे त्या व्यक्तीला आपण संपूर्ण ताकद द्यावी. मात्र जर व्यक्ती संघर्षाला उभी नाही, धडपड करायला तयार नाही. तर आपण आपला वेळ वाया घालवू नये.

+  प्रश्न सोडवताना किती लोक त्या प्रश्नाशी जोडलेले आहेत ते पहा. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घ्या.

+ अन्यायग्रस्त किंवा समस्या ग्रस्त व्यक्ती किंवा समूहाच्या आपल्या संघटनेच्या नावानी आमच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन तसेच प्रयत्न करावेत असा विनंती अर्ज घ्यावा. तसे न केल्यास व ऐनवेळी लोकांनी माघार घेतल्यास तुम्हाला या उचापती करायला सांगितले कुणी? हा प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळी हा अर्ज उपयोगी पडतो.

+ या लोकांना आपल्या संघटनेचे सदस्य बनवून घ्या. आपली शाखा त्या ठिकाणी सुरु करा.

+ योग्य अधिकाऱ्यासाठी नेमकेपनानी निवेदन तयार करून घ्या. निवेदनावर अधिकाधिक समस्या ग्रस्तांच्या सह्या / अगन्ठा घ्या.

+ सुप्रीम कोण आहे? हे शोधावे म्हणजे हा प्रश्न सोडविण्याचे अधिकार कोणत्या व्यक्तीच्या हातात आहेत हे शोधावे व मग त्याकडे आपली तक्रार द्यावी. त्याने दाखल न घेतल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करावी.

+ कोणीच दाखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरावे. मात्र आंदोलनाच्या पवित्र्याचे निवेदन अधिकाऱ्याला द्यावे. त्याची प्रत वरिष्ठ अधिकाऱ्याला तसेच पोलिसांना द्यावी. प्रत्येकाची पोच घ्यावी.

+ संबंधित अधिकाऱ्याला निवेदन देवून किमान १५ दिवसांची त्यास सवलत द्यावी. तसा उल्लेख निवेदनामध्ये  करावा.

+ प्रश्न मांडत असताना, तो कसा सोडवला जावू शकतो याच्या डायरेक्शंस आपल्या निवेदनात द्याव्या. उदा. कोणकोणत्या योजनेतून कोणकोनत्या निधीतून कोणते काम होऊ शकते इ.

+ ज्या दिवशी निवेदन द्यायचे त्याच्या आदल्या दिवशी कोणते आंदोलन, कुठे, कसे व किती वाजता करणार आहे याचे पत्र पोलिसांना द्यावे. त्याची पोच घ्यावी.

+ ग्रामपंचायत पातळीवर, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस पाटलाचे घर, तलाठी कार्यालय इ. ठिकाणी मोर्चा, धरणे, निदर्शने, रस्ता रोको इ. आंदोलने करता येईल.

+ आचारसंहिता किंवा जमावबंदी आदेश असेल तेंव्हा शक्यतो आंदोलन करू नये अन्यथा निष्कारण अटक होण्याची शक्यता असते. लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा नागरींकाचा हक्क आहे. मात्र जमावबंदीच्या वेळी आंदोलन केल्याने अटक होणे इ. प्रकारामुळे वेळ, श्रम, पैसा वाया जातो. आपले कमीत कमी नुकसान होईल ते पाहणे हि लढ्याची रणनीती असू शकते.

- दगड / काठी यांचा वापर आंदोलनात करू नये.
- शिवीगाळ करू नये.
- कोणाही व्यक्तीचे नाव घेवू नये.
- पब्लिक रीटीगेशण करणे.

+ लोकांचा सातत्याने पाठपुरावा करावा. लोक आंदोलनासाठी तयार असतील, तरच आपण आंदोलन करावे.

Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा