हिंदू मुस्लीम दंगल
हिंदू मुस्लीम दंगल बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात ही राज्ये हिंदू मुस्लीम दंगलीसाठी तशी संवेदनशील. या ठिकाणी रामनवमीचे निमित्त साधून ब्राह्मणवाद्यांनी दंगली पेटवल्या. खरेतर या दंगली नव्हेतच. हे आहेत ब्राह्मण्यग्रस्त हिंदूनी मुस्लिमांवर केलेले हल्ले. बिहार मधील ६ जिल्हे या आगीत अक्षरश: धुमसत आहेत. मुस्लिमांचे मदरसे, मस्जिदी, घरे आणि दुकाने यांच्यावर हल्ले होत होते. गरज नसताना मुद्दाम मुस्लीम वस्तीतून रॅली काढण्यात आल्या. तिकडे जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या. हातातील दगड दिसतील त्या मुस्लीम घरांवर आणि मस्जिदींवर भिरकावण्यात आले. मस्जिदीवर चढून भोंगे हटवण्यात आले. तिथे हिरवे झेंडे हटवून भगवे झेंडे फडकविण्यात आले. उन्माद इतका की मुस्लिमांच्या कब्रस्तानांवर देखील भगवे झेंडे फडकविण्यात आले. हा उन्माद आजचा नाही तर कित्येक दिवस आधी पासून याची तयारी सुरु होती. गाईचे मांस (बीफ) वर बंदी आणल्या दिवसापासून एव्हाना त्याही पूर्वीपासून हिंदू मुस्लीम दंगली पेटविण्याचे मनसुबे रचले गेले होते. एकट्या दुकट्या मुस्लीम वृद्ध व्यक्तीला जबरदस्तीने जय श्रीराम म्हण...