Posts

Showing posts with the label Farmers Rights

शेती, शेतकरी समस्या आणि आंबेडकरवाद

Image
  शेती, शेतकरी समस्या आणि आंबेडकरवाद गेली ६-७ दिवस नाशिक ते मुंबई असा चाललेला लाँग मार्च पाहतोय सोशल मिडियावर. आज मुंबईत पोहोचलाय आणि मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार आहेत. सगळीकडे लांबच लांब विळ्या हातोड्यांचे लाल झेंडे दिसत होते. जवळपास ३० ते ५० हजार शेतकरी आदिवासी लाल बावटा खांद्यावर घेवून २०० किलोमीटर चालत नाशिकहून निघालेत. वनजमिनी नावावर होण्यापासून ते स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट भाव मिळावा आणि संपूर्ण कर्जमाफी पर्यंत निरनिराळ्या त्यांच्या मागण्या आहेत. अखिल भारतीय किसान सभा या संघटनेनी या मार्च चे आयोजन केले आहे. अनेक पक्ष आणि संघटनांनी या मार्चला पाठींबा दिला आहे.या मार्चमधील ८० % मागण्या मान्य झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले. मला या प्रश्नाकडे थोडे आंबेडकरवादी भूमिकेतून पहायचे आहे. शेतकरी प्रश्न म्हणजे तो आपला विषय नव्हे असे आंबेडकरवादी पक्ष नेहमी वागतात. दलितांनी बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा आणि विचारांचा पुरेपूर उपयोग स्वत:च्या मुक्तीसाठी करून घेतला, करत आहेत. शेतकऱ्यांना ते अद्यापही जमले नाही. कारण बाबासाहेबांच...