Posts

Showing posts with the label Social Emancipation

लेनिन पेरियार आंबेडकर : आता एकीच हेच हत्यार

Image
  लेनिन पेरियार आंबेडकर : आता एकीच हेच हत्यार वास्तविक नववर्षाची सुरुवातच यांनी भीमाकोरेगाव हल्ल्या पासून केली. त्याही पूर्वीच्या उना गुजरात, आणि मुजफ्फरनगर उत्तरप्रदेश च्या घटनाची जखम अजूनही ओलीच आहे. मुस्लीम आणि आदिवासींवर होणारे हल्ले ही थक्क करून सोडणारे आहेत. किलो दोन कोलो तांदूळ चोरले म्हणून एका भुकेल्या आदिवासीला केरळमध्ये ठेचून मारल्याची घटनाही काल परवाच घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या विशिष्ट समाज प्रवृत्तीचा (ब्राह्मणी वृत्तीचा) जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच. आज त्रिपुराच्या बातम्या पहात होतो. मन अगदी विचलित झालं. एकतर माणिक सरकार पडेल आणि त्या जागी भाजप सरकार येईल हीच बाब खूप अस्वस्थ करणारी होती. भाजप वाल्यांचे असली चेहरे समोर येत असताना मन अगदी अस्वस्थ होत होत. लेनिनचा पुतळा तोडला जाणे आणि त्याच बरोबर कम्युनिस्टांच्या घरावर हल्ले, मारहाण, जाळपोळ, पार्टी कार्यालयावर हल्ले इ. बाबी बघून मन अगदी सुन्न झाले.   ही घटना ताजी आहे तोपर्यंतच या भाजप वाल्यांनी तामिळनाडू मध्येही पेरियार यांचा पुतळा तोडून टाकला. आता उत्तर प्रदेशातही भाजपवाल्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर...