ग्रामसभा जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात. माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे. ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल. अनेक गावात प्रत...
Atrocity Act आणि फिर्याद / एफ आय आर / मेडिकल Atrocity Act संबधी फिर्याद लिहिताना संबधित व्यक्तीची जात व आरोपीची जात लिहिण्यासा विसरू नये. कोणती शिवी दिली, काय धमकी दिली, कोणते शब्द वापरले ते जसेच्या तसे लिहा. मारले असल्यास नेमके कोठे मारले, कशाने मारले ते व्यवस्थित तपशील लिहा. घटना कोणासमोर घडली, कोठे घडली त्याचे व्यवस्थित तपशील लिहा. फिर्याद दिनांक, सही,इ. करण्यास विसरू नका. फिर्यादी सोबत पिडीत व्यक्तीचे (घरातील कोणाचीही) जातीचा दाखल्याची झेरॉक्स फिर्यादि सोबत जोडावी. फिर्याद स्वीकारताना अनेक अडचणी येवू शकतात. उदा. आज रविवार सुट्टी आहे. ऑफिस ६ वाजताच बंद होते. उद्या सकाळी या अशी उत्तरे पोलिसांकडून मिळू शकतात. लक्षात घ्या पोलीस स्टेशनला कधीही, कशाचीही, सुट्टी नसते व पोलीस स्टेशन २४ तास चालू असते. पोलिसास तसे ठणकावून सांगा. फिर्यादीची झेरॉक्स काढून झेरॉक्सवर पोच मागा . साहेब बाहेर गेलेत, साहेब आल्यावर या, पोच देणारा माणूस घरी गेलाय २ तासाने या असे उत्तर मिळाल्यास तुम्हीच पोच द्या असा आग्रह संबधित पोलिसांकडे करा. पोच मिळाल्याशिवाय...
Comments
Post a Comment