असली नकली चेहरे. आज सामान्य जनतेला फसवनेचा काळ आलेला आहे. सामान्य माणसाला फसवून, त्याला लुबाडून प्रचंड प्रमाणामध्ये लुट केली जात आहे. सरकारी अधिकारयाचा असा समज झाला आहे कि, त्यांना पगार हा कार्यालयात हजार राहण्यासाठी मिळतो. लोकांची कामे करण्यासाठी नव्हे. लोकांची कामे करण्याच्या बदल्यात त्यांना चिरीमिरी लोकांकडून मोबदला म्हणून मिळते. पैसे मिळाल्यावर अधिकाराचा गैरवापर करून खरयाचे खोटे व खोट्याचे खरे केले जाते. लाच न देणाऱ्याला दुपारी या, चार वाजता या, उद्या या, गुरुवारी या अशी उत्तरे मिळतात. अमुक कागद अपुरा, पलीकडच्या ऑफिसात जा, भलतीकडेच जा अशी उडवाउडवी ची उत्तरे मिळतात. काही माहिती विचारायला गेल्यास जणू गुन्हाच केला असल्यासारखे वागवतात. तलाठी ७/१२, ८ अ चा उतारा, भूमिहीन दाखला, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला इ. साठी लाच खातो, तर ग्रामसेवक आणि सरपंच अनुदान लाटतात. पोलिसांना तर तक्रारदार हवाच असतो. ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे. त्याच्या कडून भरपूर पैसे उकळून अन्याय ग्रास्ताची केस दाबने हा पोलिसांचा सरकारमान्य धंदा आहे. गुंड मवाली सामान्य जनतेकडून खंडणी वसूल करतात - बेकायदेश...